नवी दिल्ली : जुलै महिन्यात सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ जवळपास निश्चित झाली असून सरकार पुढच्या महिन्यात त्याची घोषणा करू शकते, असे वृत्त आहे. यासोबतच अशी बातमी आहे की, सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA Hike) वाढवू शकते. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना पगार वाढवून मोठा दिलासा देऊ शकते.
मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या योजनेवर सरकार काम करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
तुम्हाला HRA किती मिळतो
7 वा वेतन आयोग एचआरए वाढ: शहराच्या श्रेणीनुसार, सध्या 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के दराने घरभाडे भत्ता दिला जात आहे. सरकारने यंदा महागाई भत्त्यात वाढ केली होती, मात्र घरभाडे भत्त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत लवकरच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ होऊ शकते, असे बोलले जात आहे.
HRA कधी आणि कसा वाढेल
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता पुढील वर्षी म्हणजे २०२३ पर्यंत वाढू शकतो. यासंदर्भातील अधिसूचना सरकारने यापूर्वीच जारी केली आहे. डीए ३४ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात तीन टक्के वाढ होईल. जुलैमध्ये कर्मचाऱ्यांचा डीए ४ ते ५ टक्क्यांनी वाढू शकतो.
हे पण वाचा :
गुडन्यूज : अखेर भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या तारखेपासून पुन्हा धावणार
अबब.. ड्रग इन्स्पेक्टरच्या घरातून करोडो रुपयांचे घबाड, पैसे मोजण्यासाठी बोलावली लागली मशीन
12वी ते MBBS साठी खुशखबर.. आरोग्य विभागात निघाली मोठी पदभरती
आमदार फोडण्यासाठी 50 कोटीची ऑफर? शिवसेना आमदाराची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल ; काय म्हणाले ऐका ..
अशा स्थितीत डीए ३८ ते ३९ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. या वाढीनंतर 2022 मध्ये कर्मचाऱ्यांचा डीए आणखी वाढू शकतो. तसे झाल्यास डीएचा आकडा 50 टक्क्यांवर पोहोचणार हे निश्चित. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता 30 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
HRA कसे निर्धारित केले जाते
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या २७ टक्के घरभाडे भत्ता दिला जातो. X, Y आणि Z वर्ग शहरांच्या श्रेणीनुसार घरभाडे भत्ता निश्चित करण्यात आला आहे. X श्रेणीत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 27 टक्के HRA मिळत आहे. एचआरए Y श्रेणीमध्ये 18 टक्के आणि Z श्रेणीमध्ये 9 टक्के दराने उपलब्ध आहे.