जळगाव, (प्रतिनिधी)- शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज एरोंडल – पारोळा मतदार संघांचे आमदार चिमणराव पाटील यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.या व्हिडीओ मध्ये आमदार चिमणराव आबासाहेब पाटील (MLA Chimanrao Patil) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर शरसंधान केले आहे. तर गेली तीस वर्ष प्रथम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) संघर्ष करत आहोत. आणि तो पुढेही सुरू राहील असं त्यांनी म्हटलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोरअप्पा पाटील, सौ. लताताई सोनवणे या चार आमदारांसह मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहे. बंडानंतर ठाकरे व शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून शिंदे गटाकडून आमदारांचे म्हणणं मांडणारे व्हिडीओ सोशल पोस्ट केले जात आहे.
राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याने राजकीय भूकंप राज्याला पाहायला मिळाला असून राज्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठं बंड असल्याचं बोललं जात आहे.तर बंड करण्याचे कारण हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचेच म्हटले जात आहे. याच्याआधीही निधीच्या मुद्द्यावरून शिंदे गटातील चार आमदार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर आरोप करून बंडाचे कारण सांगितले आहे.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा मतदारसंघाचे आमदार श्री.चिमणराव आबासाहेब पाटील यांची सुस्पष्ट भूमिका….
आम्ही गेली ३० वर्ष प्रथम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष करत आहोत. काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत आमचा परंपरागत संघर्ष होता आणि यापुढेही राहील. pic.twitter.com/2TqHPHpnOo
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022