मुंबई : राज्यसभा निवडणूकच राजकारण तापलं असून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा महाविकास आघाडीने आपल्या एकीचे प्रदर्शन दाखवत कोणी कितीही प्रयत्न केले तरी आपला चौथा उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला.
मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील 12 आमदारांनी उपस्थिती लावल्यानंतर महाविकास आघाडीच्या जीवात जीव आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी यावेळी आमदारांना मार्गदर्शन केले. तब्बल 50 मिनिटे ही बैठक चालली.
या बैठकीननंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोणीही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही आमचा चौथा उमेदवार निवडून आणणारच असा विश्वास व्यक्त केला. तब्बल 20 वर्षा नंतर निवडणूक होतेय यावर लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला. सभ्यता आणि राजकारण या 2 परस्परविरोधी गोष्टी असल्या तरी राजकारणात सभ्यता पाळायला काय हरकत नव्हती अस उद्धव ठाकरे यांनी म्हंटल.
हे पण वाचा :
रिझर्व्ह बँकेने पुन्हा रेपो रेट वाढवला, EMI बोजा वाढेल
राज्यातील तासिका तत्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा
मोठी बातमी ! एकनाथ खडसे यांची राजकीय पुनर्वसनाची शक्यता
लाच भोवली; दोन सहाय्यक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीत 12 अपक्ष आमदारांनी उपस्थिती लावल्यानंतर महाविकास आघाडीचा विजयाचा मार्ग सुकर होताना दिसत आहे. या अपक्ष आमदारांमध्ये, देवेंद्र भुयार, गीता जैन, आशिष जैस्वाल, मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील, संजय शिंदे, विनोद निकोले, श्याम सुंदर शिंदे, विनोद अग्रवाल, किशोर जोरगेवार, राजकुमार पटेल, नरेंद्र भोंडकर यांचा समावेश आहे.
















