पाचोरा : तालुक्यातील पिंप्री बु्द्रुक येथे अज्ञात आरोपीने विळ्याने 80 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यावर विळ्याने वार करत तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या घटेनमुळे गावात खळबळ उडाली आहे. एका 80 वर्षीय वृ्द्धेचा इतका भयानक पद्धतीने खून करण्यात आल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्धेची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर पकडून बेड्या ठोकाव्यात. त्याच्या विरोधात कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता गावकऱ्यांकडून केली जात आहे.
हे पण वाचा :
धुळ्यातील एलआयसी एजंटच्या घरावर पोलिसांची छापेमारी, घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड
एकनाथ खडसेंसह इतर चौघांना ED ची नोटीस ; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
मी जर ती सीडी बाहेर काढली तर..; धनंजय मुडेंबाबत करुणा शर्माचे खळबळजनक वक्तव्य
भयंकर ! बाहुलीला फाशी दिली, बहुली सोडून गेल्याची समज करून ८ वर्षीय मुलीनेही घेतला गळफास
मृतक वृद्धा पिंप्री बुद्रुक येथील रहिवासी होत्या. तेजसबाई पुना जाधव असं त्यांचं नाव होतं. त्या घरात एकट्याच राहत होत्या. त्या घरात एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. अज्ञात आरोपीने तेजसबाई यांच्या गळ्यावर विळ्याने वार केले. त्यानंतर आरोपी व्यक्ती तिथून पळून गेली. विशेष म्हणजे एवढी सगळी घटना घडली तरी शेजारच्यांना घटनेची चाहूल देखील लागली नाही. हत्येनंतर बराच काळ लोटल्यानंतर तेजसबाई यांच्या घराचे लाईट का लागले नाही? असा प्रश्न गावातील नातेवाईकांना पडला.
पोलिसांनी वृद्ध तेजसबाई यांचा मृतदेह पाहिला असता त्यांच्या गळ्यावर विळ्याने वार करण्यात आल्याचं निदर्शनास आलं. तसेच वृद्ध महिलेच्या छातीवर विळा पडलेला दिसून आला. त्यामुळे महिलेचा खून झालाय हे स्पष्ट झालं. पण वृद्धेचा खून का करण्यात आला? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. पोलीस लवकरात लवकर अज्ञात आरोपीच्या मुसक्या आवळतील आणि तेजसबाई यांना न्याय देतील, अशी आशा गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.