Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशनच्या चौथ्या तिमाही उत्पन्नात 16.2 टक्क्यांची वाढ

Editorial Team by Editorial Team
May 31, 2022
in जळगाव
0
जैन इरिगेशनच्या चौथ्या तिमाही उत्पन्नात 16.2 टक्क्यांची वाढ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या व भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडने संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाही तसेच चालू आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणापूर्वीच्या आर्थिक निकालास मंजूरी दिली. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 30 मे रोजी पार पडली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीमध्ये एकत्रीत उत्पन्नात 16.2 टक्के वाढ दर्शविली आहे. ह्या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न 7119.5 कोटी रुपये आहे जे गतवर्षी याच काळात केवळ 5666.9 कोटी रुपये इतके होते. कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी कंपनीच्या वाटचालीविषयी संवाद साधला.

चौथ्या तिमाहिच्या (4QFY22) एकत्रित निकालाचे वैशिष्ट्ये :

· सर्व प्रमुख व्यवसाय विभागांमध्ये सकारात्मक वाढ नोंदवून वार्षिक आधारावर महसूल 16.2% ने वाढला.
· विदेशी बाजारपेठेतील चांगल्या मागणीमुळे हाय-टेक कृषी निविष्ठा उत्पादन विभागाने वार्षिक 6.8% ची वाढ नोंदवली.
· सर्व उत्पादनांच्या साखळीमध्ये प्लॅस्टिक विभागाने सर्वाधिक वार्षिक 50.1% वाढ नोंदवली.
· देशांतर्गत व परदेशातील बाजारपेठेतील उच्च विक्रीमुळे कृषी प्रक्रिया विभागाने वार्षिक 17.3% ची वाढ नोंदवली.
· 4QFY22 साठी कर, व्याज व घसारा पूर्व नफा (EBIDTA) वार्षिक आधारावर 11.2% वरून 12.7% पर्यंत वाढला.
· कर्ज पुनर्रचनेच्या संकल्प योजनेच्या अंमलबजावणीमुळे एकवेळ नफा (अपवादात्मक बाबी) झाल्यामुळे करपश्चात नफ्यामध्ये लक्षणीय वाढ.

आर्थिक वर्ष 2022 चा (FY22) एकत्रित निकाल :

भारतासह परदेशातील सर्व प्रमुख व्यवसाय विभागांमध्ये सकारात्मक वाढीमुळे एकूण महसुलात 25.6% वाढ झाली आहे.
हाय-टेक अॅग्री इनपुट प्रोडक्ट्स डिव्हिजनने 20.9% वार्षिक वाढ नोंदवली आहे.
प्लॅस्टिक विभागामध्ये 43.0% वार्षिक वाढीची भरभक्कम वाढ नोंदवली गेली.
कृषी प्रक्रिया विभागात लक्षणीय सुधारणा झाली 24.4% वार्षिक वाढ नोंदवली.
FY22 साठी 13.1% वर कर, व्याज व घसारा पूर्व नफा (EBIDTA) वार्षिक आधारावर 487 बेसिस पॉइंटने वाढले.

कर्ज पुनर्रचनेच्या संकल्प योजनेच्या अंमलबजावणीमुळे आणि विदेशी उपकंपनीमध्ये बाँड पुनर्रचनेमुळे एकवेळ लाभ झाल्यामुळे करपश्चात नफ्यामध्ये लक्षणीय वाढ.

वैश्विक पातळीवर कंपनीकडे 3592.8 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स हातात आहेत, त्यात हाय-टेक ऍग्री इनपुट उत्पादने विभागासाठी 2028.4 कोटी रुपये, प्लास्टिक विभागासाठी 627.6 कोटी रुपये आणि कृषी प्रक्रिया विभागासाठी 936.2 कोटी रुपयांच्या ऑर्डरचा यात समावेश आहे.

हे पण वाचा :

शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

महागाईचा बसणार झटका ! उद्या गॅस दरवाढीचा बॉम्ब फुटण्याची शक्यता

संतापजनक! पोटच्या मुलीवर जन्मदात्या बापाने केला ११ वर्षे लैंगिक अत्याचार, नराधम बापाला अटक

नवऱ्यावरील राग अनावर! निर्दयी आईने ६ चिमुरड्यांना विहिरीमध्ये फेकले

चौथ्या तिमाहिचा (4QFY22) एकल निकाल :

प्लास्टिक उत्पादन विभागातील वाढीमुळे एकूण महसूल 12.2 टक्क्यांनी वाढ झाली.
आर्थिक वर्षाच्या (4QFY22) चौथ्या तिमाहित (एकल) कर, व्याज व घसारा पूर्व नफा साठी (EBIDTA) 12.2 टक्के आहे.

आर्थिक वर्ष (FY22) एकल निकाल

एकूण महसूल 30.7% ने वाढला.
हाय-टेक अॅग्री इनपुट प्रॉडक्ट्स डिव्हिजनने 27.0% वार्षिक वाढ नोंदवली.
प्लॅस्टिक विभागामध्ये 37.7% वार्षिक वाढ नोंदवली गेली.
सध्यस्थितीत भारतातील (डोमॅस्टिक) हाती असलेल्या ऑर्डर्समध्ये 2050.3 कोटी आहे ज्यामध्ये हाय-टेक ऍग्री इनपुट उत्पादने विभागासाठी 1447.0 कोटी रुपये तर प्लास्टिक विभागासाठी 622.8 कोटी रुपयांच्या ऑर्डरचा समावेश आहे.

“आम्हाला कंपनीच्या चौथी तिमाहीचा (Q4) लेखापरिक्षण केलेला आर्थिक निकाल जाहीर करतांना आनंद होत आहे. कंपनीने सर्वांगिण वाढ साध्य केली आहे. कंपनीच्या एकल व एकत्रित व्यवसायात 25.6 % वाढ (Y on Y) झाली. आणि (EBIDTA) कर व्याज व घसारा पूर्व नफा जवळजवळ शंभर टक्केने वाढला. तिसऱ्या तिमाही च्या शेवटी आम्ही काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. मला आनंद होतो की, चौथ्या तिमाहीत सगळ्याच व्यवसायांमध्ये समाधानकारक काम व सुधारणा झाली. मार्च 2022 शेवटी कंपनीची कर्ज निराकरण योजना अमलात आली आणि कंपनीच्या सर्व भागधारकांनी केलेल्या कठीण परिश्रमामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे कर्ज निराकरण योजना पूर्ण होण्यापूर्वी खेळत्या भांडवलावर मर्यादा आली होती आणि मागील काही वर्षांत कंपनीची कामगिरी मागे पडली होती. त्यात चांगले काम करण्याचा पाया रचला गेला.मागिल FY-2021-22 आर्थिक वर्षांत कंपनीच्या कामकाजात प्रगती झाली आणि त्यात स्थैर्य आले. व्यवसायातील सकारात्मक सुधारणा झाली तरी कच्या मालाच्या किंमतीमध्ये आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत व्यत्यय आले. कंपनीचे लक्ष हातात असलेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्यावर असून थकीत रक्कम वसूली करण्यात देखील लक्ष केंद्रीत केले आहे. कंपनीने किरकोळ विक्रेत्यांचे जाळे विस्तारले. कृषी व्यवसायात करार शेतीचा विस्तार करणे आणि टिश्यूकल्चर व्यवसायात तंत्रज्ञानावर आधारित विस्तार करायचे लक्ष निर्धारित केले आहे.

-अनिल जैन, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईचा बसणार झटका ! उद्या गॅस दरवाढीचा बॉम्ब फुटण्याची शक्यता

Next Post

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 10वी पास उमेदवारांना संधी.. असा करा अर्ज

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबईहून भुसावळकडे येण्यासाठी २० उन्हाळी विशेष गाड्या

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 10वी पास उमेदवारांना संधी.. असा करा अर्ज

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us