मुंबई : भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका करत पुन्हा डिवचले आहे. “उद्धव ठाकरे बोलतो काय? करतो काय? हेच कळत नाही. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून ती आता म्याव-म्याव, ब्या ब्याsss, बकरीसेना झाली आहे, अशी टीका राणेंनी केली आहे.
मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मालवण देवबागमधील बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांची असणारी शिवसेना काय होती. आणि आता त्यांची शिवसेना काय झाली आहे. या सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय करतायत हेच कळत नाही. उद्धव ठाकरे काय बोलतो? काय करतो? असा सवाल विचारत बाळासाहेबांची शिवसेना हि आता शिवसेना राहिली नसून ती बकरीसेना झाली आहे.
हे पण वाचा :
रेल्वेत नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी..10वी पाससाठी बंपर रिक्त जागा
जुळे असल्याचा फायदा भावाच्या पत्नीसोबत केले धक्कादायक कृत्य
धक्कादायक ! लग्नाचे आमिष देत तब्बल साडे सहा महिने केला अत्याचार, अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे या पदांसाठी भरती, वेतन ७५०००
भारतीयांच्या लग्नाआधी आणि बाहेरच्या लैंगिक संबंधाबद्दल धक्कादायक सरकारी अहवाल समोर
शिवसेनेवर टीका करताना नारायण राणे यांनी केंद्र सरकारबद्दल महत्वाचे विधान केले. यावेळी ते म्हणाले की, केंद्रात आणखी 50 वर्षे भाजपचीच सत्ता राहणार आहे. सर्व जाती, धर्माच्या व्यक्तींना भाजप पक्ष आपल्यात सामावून घेत आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात भाजपचा जनाधार वाढत आहे, असे राणे यांनी म्हंटले आहे.