जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील वाल्मीकनगर मधील कोळी पेठेत गेल्या चार दिवसांपासून विद्युत खांब अचानक पूर्णपणे एका बाजूने वाकलेला अवस्थेत आहे मात्र महावितरणचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने नाराजी व्यक्त होतं आहे. अखेर नागरिकांनी कोणतीही मोठी घटना होऊ नये म्हणून खांबाला दोरीने एका झाडाला बांधून ठेवण्यात आले आहे. महावितरण कडून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार उघडकीस आला असून या वीज खांबाचा कायमस्वरूपी तात्काळ दुरुस्ती व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.
वृद्धाला विजेचा धक्का…
शनिवारी सकाळी एका वृद्धाला या विदयुत खांबातील वीजप्रवाहाचा धक्का बसला असता नागरिकांनी खबरदारी घेऊन तत्काळ खांबापासून या वृद्धाला बाजूला घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.या प्रकरणी परिसरातील रहिवाशांनी चार दिवसांपासून महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना आणि कोंबडी बाजार येथील महावितरणच्या कार्यालयातही अर्ज दिला असून, अद्यापही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेतल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
विजेच्या खांबाला दोरीने बांधले…
विजेच्या खांबातून वीज प्रवाह होऊन नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून विद्युत खांब वाकल्यामुळे नागरिकांनी खांब कोसळू नये म्हणून खांबाला जवळच्या एका झाडाला दोराने बांधण्यात आले आहे.
–