एरंडोल: ३४ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एरंडोल शहरातील जहांगिरपुरा भागात घडलीय. रूपाली विश्वनाथ पाटील वय ३४ असे या विवाहितेचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
याबाबत असे कि,जहांगिरपुरा भागात रूपाली पाटील या विवाहितेने घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ एप्रिल रोजी घडली आहे. याबाबत त्यांचे पती विश्वनाथ पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली आहे.
विश्वनाथ पाटील हा मालवाहतूक रिक्षा व शेती व्यवसाय करीत असून त्यांची पत्नी रूपाली ही ब्युटी पार्लर व शिवणकाम करीत. दि. २३ एप्रिल रोजी विश्वनाथ हा त्याची मालवाहतूक रिक्षा घेऊन रिंगणगाव येथून परत येत असताना विखरण गावाजवळ आला असता त्याला फोन वरून त्याच्या घराजवळ लोकांची गर्दी जमल्याचे सांगण्यात आले.
तो घरी पोहोचल्यावर त्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याला समजले. गल्लीतील नागरिकांसोबत विश्वनाथ हा वरच्या मजल्यावर जाऊन पत्नी रूपालीने गळफास घेतलेला आढळून आला. तेव्हा ॲम्बुलन्समध्ये टाकून तिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तपासणीअंती तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. विश्वनाथ यांना आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.