Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयुष्मान भारत योजनेतून ३ कोटींपेक्षा अधिक लोकांवर उपचार ; आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांची माहिती

najarkaid by najarkaid
April 9, 2022
in जळगाव
0
आयुष्मान भारत योजनेतून ३ कोटींपेक्षा अधिक लोकांवर उपचार ; आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांची माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.०९ –  मोदी सरकारने गोरगरीब, वंचितांसाठी सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनेतून आजवर देशभरात ३.२८ कोटींपेक्षा अधिक लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ कोटींपेक्षा अधिक लोकांना आयुष्मान कार्ड चे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वस्त दरात औषधे पुरविण्याच्या उद्देशाने देशभरात ८ हजार ६९४ पंतप्रधान जनऔषधी केंद्रे सुरुकरण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या स्थापनादिनानिमित्त मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, गोरगरीब, वंचित वर्गातील जनतेला अनेक आजारांवरील महागडे उपचार परवडत नाहीत हे ओळखून मोदी सरकारने सप्टेम्बर २०१८ मध्ये आयुष्मान भारत योजनेचा प्रारंभ केला. या योजनेत खासगी आणिसरकारी रुग्णालयांत ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या योजनेत सरकारी आणि खासगी मिळून २७ हजार ३०० रुग्णालये सहभागी झालीआहेत. आयुष्मानभारत डिजिटल मिशनसाठी मोदी सरकारने सोळाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यायोजनेत देशभरातील १०.७४ कोटींपेक्षा अधिक गोरगरीब, वंचितकुटुंबांना म्हणजे ५० कोटी लोकांना मोफत उपचाराची सुविधा देणे हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेची माहिती मिळवण्यासाठी mera.pmjay.gov.in नावाचेसंकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.

तसेच 14555 आणि 1800-111-565 टोल फ्रीक्रमांकांवरही या योजनेची माहिती मिळू शकेल. या योजनेचा लाभ घेतलेल्यांमध्ये सुमारे ४७ टक्के महिला आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.ते म्हणाले की, देशातील आरोग्य सेवा आणिसुविधा परिपूर्ण बनविण्यासाठी मोदी सरकारने ‘आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन’सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ६५ हजार कोटी रुपये खर्चून देशभरातीलआरोग्य केंद्रात अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हापातळीवरील सरकारी रुग्णालयात आयसीयु, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन या सुविधांसह ३७ हजारबेड उपलब्ध केले जाणार आहेत.

या बरोबरच ब्लॉक पातळीवर ४ हजार पेक्षा अधिकसार्वजनिक आरोग्य केंद्रे तसेच प्रयोगशाळा सुरु केल्या जाणार आहेत. मोदी सरकारने सिरींज, डिजिटल थर्मामीटर, स्टेंट, डायलिसिस मशीन या सारख्या उपकरणांना औषधांच्या श्रेणीत आणल्यामुळे या उपकरणांच्या किंमती नियंत्रणात आल्या आहेत. मोदी सरकारने कॅन्सर, टीबी, मधुमेह यासारख्यादुर्धर आजारावरील ८०० औषधे कमी किमतीत उपलब्ध करून दिली आहेत. स्वस्त दरात औषधेउपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची संख्या ९ मार्च २०२२ पर्यंत ८ हजार ६९४ पर्यंत पोहचली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ भोजपुरी अभिनेत्रीचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Next Post

कीर्तनकार ‘बाबा’चे महिलेसोबत नको त्या अवस्थेत चाळे; Video होतोय व्हायरल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

कीर्तनकार 'बाबा'चे महिलेसोबत नको त्या अवस्थेत चाळे; Video होतोय व्हायरल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us