केरळ : सध्या प्री वेंडीग आणि पोस्ट वेडींग फोटोशूजचं खूप क्रेझ आहे. पण हे क्रेझ एका नवविवाहित तरुणाच्या जीवावर बेतली आहे. नदीत बुडून नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीची प्रकृती गंभीर झाल्याची दुर्दैवी घटना केरळातील कोझीकोडमध्ये कुटीआडी नदी घडली आहे. नदी किनारी फोटो शूट करत असताना हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे.
कोझीकोडमधील पलेरी येथे राहणारा राजील याचा मृत्यू झाला आहे तर त्याची पत्नी कनिहा हिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकं काय घडलं?
घटनेच्या दिवशी नवविवाहित दांपत्य कुटीआडी नदीच्या किनारी फोटोशूटचा आनंद घेत होते. यादरम्यान नवरदेवाचा पाय सरकला आणि सोबतच नवरीदेखील वाहत्या पाण्यात वाहू लागली. नवरी पाण्यात बुडताना पाहून तिला वाचवण्यात यश आलं मात्र नवरदेवाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मृत रेजिलला पोहता येत नव्हतं. खडकावरुन पाय घसरल्यानंतर तो नदीतील खोल खड्ड्यात अडकला आणि श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे पेरूवन्नमुझी पोलिसांनी सांगितले आहे.
कुटीआडी नदीत अचानक लाटा उसळून अपघात झाल्याच्या अनेक घटना याआधीही उघडकीस आल्या आहेत. नदीपात्रात बुडून अनेकांनी यापूर्वीही प्राण गमावले आहेत. पेरूवन्नमुझी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.