रणबीर कपूर आणि आलीया भट लग्न बंधनात अडकणार असल्याचे खात्रीलायक वृत्त माध्यमातून समोर आले असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हा विवाह सोहळा पार पडणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट रिलेशनमध्ये आहेत. हे दोघे कधी लग्न करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून रणबीर कपूर आणि आलीया भट यांच्याकडे पाहिलं जातं.आलियाचे आजोबा एन राजदान यांची तब्येत फारशी चांगली नाही. त्यांना आपल्या नातीचं लग्न बघायचं असल्याची इच्छा जाहीर केली आहे. आलियाच्या आजोबांना रणबीर खूप आवडतो. आजोबांच्या इच्छापूर्तीसाठी लग्न मुहूर्त ठरला असावा.

दोघांचं लग्न कपूर हाऊसमध्ये होणार
या दोघांच्या घरी आता लवकरच विवाह सोहळ्याच्या जय्यत तयारीला सुरवार झाली असेल त्याचप्रमाणे या दोघांचं लग्न कुठं होणार हे देखील चाहत्यांना प्रश्न पडला होता मात्र या दोघांचा विवाह ‘कपूर हाऊस’ मध्ये होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
















