बहुचर्चित ‘कच्चा बादाम’ गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता रितेश देशमुख या जोडीने डान्स केला असून या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडिया मोठा फेमस असून ९ लाखाच्यावर लाईक या व्हिडीओला मिळाले आहे. तुम्ही सुद्धा एकदा हा व्हिडीओ पहाच…
सध्या सोशल मीडियावर ‘कच्चा बादाम’ हे गाणं प्रचंड चर्चेत आहे. हे गाणं पश्चिम बंगालमधील शेंगदाणा विक्रेता भुबन बड्याकरने गायलं आहे. त्यानंतर त्या गाण्यावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असतांना आता बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि अभिनेता रितेश देशमुखचा या गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ द फेम गेम या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. इथे रितेश आणि माधुरी डान्स करताना दिसत आहेत.या व्हिडीओची सोशल मीडियात चांगलीच क्रेज पाहायला मिळत आहे.