पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोसह विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तसेच पुण्यातील पहिल्या मेट्रोचे उदघाटन केले. दरम्यान, पंतप्रधानांची आता एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर प्रचारसभा सुरु आहे. यावेळी पंतप्रधानांच्या अगोदर मान्यवरांचे भाषण सुरु आहे.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात राज्याचे राज्यपाल भागात सिंग कोश्यारी यांना टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना अजित पवार, “अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. ती मान्य देखील होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. मनात कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो, असे म्हणत त्यांनी राज्यपालांना चिंता काढला.
तसेच मला एक गोष्ट पंतप्रधानांना सांगायचीये. राज्यात पहिली मेट्रो अंधेरीत झाली. नागपूरची मेट्रो आपल्याच शुभहस्ते २०१४ला भूमिपूजन झालं आणि २०१९मध्ये मेट्रो सुरू झाली. पंतप्रधानांना मला विनंती करायची आहे, की अजूनही पिंपरी चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज आणि पुण्यातल्या वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेड या जोडमार्गांचा अहवाल तयार करायचं काम सुरू आहे. जसं आत्ताच्या मेट्रोमध्ये ५० टक्के केंद्र सरकार, ५० टक्के राज्य सरकारचा निधी आहे, त्याचप्रकारे या बाकीच्या मार्गांसाठी देखील केंद्राची मदत झाली, तर पुणेकरांसाठी मोठं काम होईल असेही त्यांनी म्हटले.