Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई विमानतळ उद्यापासून 100 टक्के प्लास्टिकमुक्त

najarkaid live by najarkaid live
October 1, 2019
in राज्य
0
मुंबई विमानतळ उद्यापासून 100 टक्के प्लास्टिकमुक्त
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई- मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या म्हणजेच 2 ऑक्टोबर पासून 100 टक्के प्लास्टिकमुक्त होणार आहे. जीव्हीकेने सोमवारी ही घोषणा केली. ’विमानतळावर सर्व एकल वापराच्या प्लास्टिकविरोधात प्लास्टिक उत्पादनांना बंदी असेल. यात थर्माकोलपासून बनवलेली डिस्पोजेबल कटलरी (पॉलिस्टीरीन किंवा प्लास्टिक) पेट बॉटल्स (200 एमएलपेक्षा कमी), प्लास्टिक बॅग (हँडल शिवाय आणि हँडल असलेल्या), स्ट्रॉ, थर्मोकोल आयटम्स आणि बबल रॅपचा समावेश आहे.’ अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली. याऐवजी जीव्हीके लाउंजमध्ये स्टीलचे स्ट्रॉ, कटलरी आणि अन्य बायोडिग्रेडेबल मटेरिअलच्या वस्तू, कापडी पिशव्या वापरल्या जाणार आहेत.
दरम्यान, पालिकेनेही नागरिकांना प्लास्किटमुक्तीचे आवाहन केले आहे. नियमभंग करणार्‍यांवर पाच हजार रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कारवाई किंवा तीन महिने कैद आणि 25 हजारपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. ’सर्व नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिक जवळच्या संकलन केंद्रात जमा करायचे आहे,’ असं मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे.
देशभरातील 129 विमानतळ ’प्लास्टिकमुक्त’ करण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) घेतला होता. त्यापैकी 35 विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली. पण मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या मोहिमेपासून दूरच होते.
गांधीजयंतीपासून देशात प्लास्टिकबंदी?-
एएआयच्या ताब्यात जवळपास 135 विमानतळ आहेत. या विमानतळांचा प्रदूषण अभ्यास जानेवारी महिन्यात करण्यात आला. त्याआधारे सध्या कार्यरत असलेल्या 129 विमानतळांवर प्लास्टिकचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत केवळ एकदा वापरात येणार्‍या प्लास्टिकच्या वस्तू, बाटल्या, पेले, पिशव्या आदींवर विमानतळ परिसरात बंदी घालण्यात आली. पहिल्या टप्प्यात 15 विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली.
प्लास्टिकबंदीबाबतचा निर्णय एएआयने त्यांच्या अखत्यारित असलेल्या विमानतळांबाबत घेतला आहे. पण मुंबई विमानतळाची मालकी जीव्हीके समूहाकडे आहे. त्यामुळे देशात सर्वाधिक व्यग्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर प्लास्टिकमुक्तीचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता. तसे असले, तरी एएआयने प्लास्टिकबंदी केलेल्या 35 विमानतळांमध्ये राज्यातील पुणे, गोंदिया, औरंगाबाद येथील विमानतळांचा समावेश आहे.
पंतप्रधानांचे आवाहन-
महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे निमित्त साधून दोन ऑक्टोबरपासून पर्यावरणाची हानी करणार्‍या प्लास्टिकचा वापर करु नये, असे आवाहन 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधताना पंतप्रधान मोदी यांनी केले होते. प्लास्टिकऐवजी ज्यूटच्या थैल्या वापरण्याचा सल्ला त्यांनी दुकानदारांना दिला होता.
सिक्कीम अग्रेसर-
भारतात प्लास्टिक बंदीचे प्रयत्न यापूर्वीही अनेकदा झाले असून ते यशस्वी होऊ शकलेले नाही. 1998 साली सिक्कीममध्ये प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. ती कमालीची यशस्वी ठरली असून प्लास्टिकचा अजिबात वापर न करणारे सिक्कीम हे भारतातील आदर्श राज्य ठरले आहे. मात्र, अन्य राज्यांना सिक्कीमचे अनुकरण करणे शक्य झालेले नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुरुवात त्यांनी केलीय, खेळ आम्ही संपवू

Next Post

आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार

Related Posts

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

June 30, 2025
पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

June 30, 2025
Next Post
आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार

आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार

ताज्या बातम्या

How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us