जळगाव : राजकारण स्वार्थासाठी नसावे, समाजाच्या, सामान्यांच्या विकासासाठी उद्धारासाठी असावे, विचारांची लढाई विचारांनी लढावी, पराभवाची भीती विरोधकांच्या कृतीतून साफ झळकत आहे. खुर्च्या तोडून खुर्ची वाचविण्याची केविलवाणी धडपड समोर आली आहे. आम्ही मात्र लढू व बदल घडवू, असा स्पष्ट विश्वास भाजपचे इच्छुक उमेदवार लकी टेलर यांनी व्यक्त केला आहे.
लकी टेलर यांनी सुरू केलेल्या दौऱयांमध्ये त्यांना सर्वस्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तरुण, शेतकरी, सर्व सामन्यांच्या आग्रहास्तव निवणुड लढविण्याचा निर्णय घेल्यानंतर त्यांनी आपल्या कामाच्या बळावर व आगामी व्हिजन मांडून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकीकडे कामे नसल्याने विद्यमान युतीची वाट बघत बसले असून, पावणे पाच वर्षात काही न केल्याने आता एका दिवसात पाच पाच भूमिपूजन होताय, मतदारांना गृहीत धरून पुन्हा आपणच या अविर्भावात असलेल्याना मतदार जागा जरूर दाखवतील. आम्ही केवळ भाषणे देणार नाही. अधिक भर कामावर देऊ, म्हणजे भाषणाची गरजच पडणार नाही.
गेल्या पाच वर्षात जळगाव ग्रामीण मतदार संघात कामांची बोंब असल्यानेच आता तोडफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतदारांना बदल अपेक्षित आहे. मतदार स्वतः हे बोलून दाखवत आहे, त्यामुळे आपण यासाठी सज्ज असल्याचे लकी टेलर यांनी म्हटले आहे.