मुंबई : देशातील पाच राज्यातील निवडणूक जाहीर झाल्या आहेत. त्यात महत्वाची म्हणजे उत्तर प्रदेशातील निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागला आहेत. उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींवरून विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशातील राजकारण देशात चर्चेत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य केलं. उत्तर प्रदेशमध्ये आता अनेक मंत्री राजीनामा देत आहेत. यावरून स्पष्ट होतं आहे की, लोकांना तेथील सरकारबाबत अविश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे तिथं अशी हालचाल दिसू लागली आहे. अशी टीका राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
आमचं सरकार लोकशाहीला धरून आहे. त्यामुळे प्रत्येकाला मनमोकळेपणे बोलण्याचा आणि संवाद साधण्याचा इथं अधिकार आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी असं बोलणं हे योग्य नाही, असे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटलांना सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. तसेच ओबीसीच्या इंपेरिकल डेटासाठी पंतप्रधान यांना मुख्यमंत्री यांनी अनेकवेळा पत्र लिहिलं आहे. परंतु तरीदेखील त्यांच्याकडून कोर्टात एक आणि संसदेत एक अशी ओबीसी इंपेरिकल डेटाबाबत माहिती दिली जाते, त्यामुळे कुठं तरी भाजप मधील ओबीसींमध्ये खदखद आहे. अशी टीकाही त्यांनी केली आहे.
स्वबळावर लढण्यात गैर काय?
गोव्यात काँग्रेसने स्वबळाचे संकेत दिल्यानंतर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. त्यामुळे काँग्रेस गोव्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत असेल तर त्यामध्ये गैर काय आहे? असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच 12 निलंबित आमदारांबाबत महाविकास आघाडी नक्कीच योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.