जळगाव – जामनेर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार तथा सरकारचे संकटमोचक विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचे दिसून येत आहे.
जामनेर विधानसभा मतदार संघावर गिरीश महाजन यांची पकड लक्षात घेता व जामनेर तालुक्याचा विकास पाहता कार्यकर्त्यांना असा विश्वास असणं साहजिक आहे. गिरीश महाजन यांच्या पक्षाने मोठी जबाबदारी दिली असल्याने त्यांना आपल्याच मतदार संघात प्रचार करायला जास्त वेळ मिळणार नाही हे तेवढेच खरे असले तरी त्यांचे कारकर्ते मात्र प्रचारात आघाडीवरच राहतील हे तेवढेच खरे आहे. विरोधी पक्ष गिरीश महाजनांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचा काही फारसा फरक पडणार नसल्याचे बोलले जात आहे.