Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतात महिला वैमानिकांची संख्या किती आहे, माहित आहे का ?

najarkaid by najarkaid
December 6, 2021
in Uncategorized
0
भारतात महिला वैमानिकांची संख्या किती आहे, माहित आहे का ?
ADVERTISEMENT

Spread the love

अमेठी (उत्तर प्रदेश) येथे आरजीएनएयू कायदा, 2013 अंतर्गत स्थापन केलेले राजीव गांधी राष्ट्रीय हवाई वाहतूक विद्यापीठ (आरजीएनएयू) हे भारतातील एकमेव हवाई वाहतूक विद्यापीठ आहे. हे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या प्रशासकीय अखत्यारीत कार्यरत आहे.सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलद्वारे इतर कोणतेही हवाई वाहतूक विद्यापीठ स्थापन करण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नसून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या ई-गव्हर्नन्स सेवेकडे (eGCA) उपलब्ध माहितीनुसार भारतात नोंदणीकृत एकूण 17,726 वैमानिक आहेत यामध्ये महिला वैमानिकांची संख्या 2,764 इतकी आहे.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि त्याच्याशी संबंधित संस्थांनी देशातील वैमानिकांच्या प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (बेळगाव, जळगाव, कलबुर्गी, खजुराहो आणि लीलाबारी) पाच विमानतळांवर नऊ नवीन उड्डाण प्रशिक्षण संघटनांसाठी (फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन, एफटीओ) पुरस्कार पत्र जारी करणे, तर्कसंगत जमीन शुल्क इत्यादी, नियामक डीजीसीए मधील मंजुरी प्रक्रियेचे डिजिटायझेशन आणि विमान प्रशिक्षकांचे सक्षमीकरण इत्यादीचा समावेश आहे. या उपायांमुळे एफटीओ मध्ये उड्डाणाचे तास आणि दरवर्षी जारी केलेल्या व्यावसायिक पायलट परवान्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. महिला वैमानिकांसह सर्व वैमानिक होऊ इच्छिणाऱ्यांना याचा फायदा होईल.

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीत महिला (द वुमन इन एव्हिएशन इंटरनॅशनल, डब्लूएआय) – भारतीय शाखा, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, उद्योग क्षेत्र आणि आघाडीच्या महिला विमान व्यावसायिकांच्या सहकार्याने देशभरात अनेक जागरुकता कार्यक्रम आयोजित करत आहे, विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील तरुण शालेय मुलींवर विशेष लक्ष केंद्रित करते.

जागतिक स्तरावर, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ वुमन एअरलाइन पायलट्सनुसार, सुमारे 5% वैमानिक महिला आहेत. भारतात, महिला वैमानिकांचा वाटा लक्षणीयरित्या जास्त अर्थात – 15% पेक्षा जास्त आहे.नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल डॉ. व्ही. के. सिंग, (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

Spread the love
Tags: महिला वैमानिक
ADVERTISEMENT
Previous Post

महा सूर्याचा अस्त कधीच होत नसतो..!

Next Post

७० हजार रिक्त जागा भरण्यासाठी भव्य रोजगार मेळावा

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी ; १८२८ विविध पदांची भरती

७० हजार रिक्त जागा भरण्यासाठी भव्य रोजगार मेळावा

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us