सहकार राज्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याने बसला हादरा
जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती
जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जागा भाजपला सोडण्याची मागणी
जळगाव – जळगाव ग्रामीण मतदार संघातून भूलथापा देणाऱ्याला पाडायचेच असून पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी सक्षमपणे उभेराहा असे आवाहन जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी इच्छुक उमेदवार लकी अण्णा टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी आज धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले . यावेळी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या पाळधी येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळावा झाल्याने सहकार राजमंत्र्यांच्या बालेकिल्ला हादरला असल्याची जोरदार चर्चा मेळाव्यासह मतदार संघात दिवसभर सुरु होती .
याप्रसंगी व्यासपीठावर पीसी आबा पाटील, जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे ,प्रभाकर पवार,नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर रोटे, नगरसेवक कैलास माळी, संदीप पाटील ,सुभाष पाटील, संजय महाजन, किशोर नारखेडे, रामभाऊ काळे, शिरीष भोई, डॉ. मुंदडा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना लकी टेलर म्हणाले कि , मी उमेदवारीसाठी गेल्या २५ दिवसांपासून एकेक गाव फिरत आहे. मला जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. मात्र मतदार संघात पावसाळा असताना डांबरीकरणाच्या शुभारंभाचे उदघाटन होत असून डांबरीकरणाचे रस्ते नारळ घेऊन फोडताहेत असल्याची टीका लक्ष्मण टेलर यांनी सहकार राज्यमंत्र्यांवर केली . सोशल मीडियाच्या माध्यमातून आजची पिढी जाणून असून चुकीच्या उमेदवाराला थांबवायचा निर्धार करून भाजप जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन करून भूलथापा देणार्याला पाडायचे आहे असेही लकी टेलर यांनी सांगितले.
मी निवडणुकीच्या रिंगणाबाहेर – पीसी आबा पाटील-
मी निवडणुकीच्या रिगनबाहेर असून सत्तेचा माज उतरवायचा आहे. आता डावपेच खेळायचे असून पाळधीसह मतदार संघात विकास झाला नसून मंत्र्याचा उपयोग कुणालाही आणि कुठलाही झाला नसून मंत्री ,त्यांचा मुलगा आणि त्यांचे चार पाच कार्यकर्ते सोडल्यास कुणालाच उपयोग झाला नाही . मंत्री गुलाबराव पाटील यांनी ५ वर्षांपूर्वी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते . मात्र कुणालाच रोजगार मिळाला नसून गुलाबराव पाटील दिशाभूल करीत असल्याचे जनतेला माहित आहे. यासाठी सावध राहावे असे आवाहन पीसी आबा पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले .
यावेळी नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, माजी तालुकाध्यक्ष कैलास चव्हाण, प्रभाकर पवार, सुभाष पाटील यांची भाषणे झाली . प्रास्तविक कमलाकर रोटे यांनी केले.