पाळधी, ता.धरणगाव- आज जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भाजपाचा कार्यकर्ते पाळधी येथे आयोजित करण्यात आला आहे. परंतू काल रात्री १ वाजेच्या सुमारास मेळाव्यास्थळी काही अज्ञात लोकांनी येऊन तोडफोड केली. तसेच काही स्वयंपाक करणाऱ्या लोकांना मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, ही तोडफोड ना.गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांनी केल्या असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे.