पाचोरा (प्रतिनिधी) येथील शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष तथा सिंधी समाजाचे प्रथितयश व्यापारी चंदू केसवानी यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे .
माजी. आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी आज रविवार ता 22 रोजी सायंकाळी केसवानी यांचा प्रवेश सोहळा झाला यावेळी असंघटित कामगार सेनेचे प्रमुख फहीम शेख सलीम खान यांनीही सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचे घड्याळ बांधत दिलीप वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या सोबत राहण्याचा संकल्प केला.
यावेळी संजय वाघ खलील देशमुख महंमद मिस्तरी राभाई हारुण देशमुख सतीश चौधरी विकास पाटील संजय सूर्यवंशी सलीम खान हुसेन शहा सलीम शहा सुभान शहा सैय्यद तारीख रहमान शहा कालिया बागवान सरपंच रशीद मणियार(जारगांव) प्रा राकेश सोनवणे रणजीत पाटील नितीन तावडे भगवान मिस्तरी संजय सूर्यवंशी शशिकांत चंदिले शांताराम भुजबळ शांताराम चौधरी आदी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी केै .ओंकार आप्पा वाघ यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जयघोष करत दिलीप वाघ यांना विजयी करण्याचा एकमुखी निर्धार केला.
फोटो र् पाचोरा येथे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल चंदू केसवानी यांचा सत्कार करताना दिलीप वाघ बाजूला संजय वाघ खलील देशमुख नाना देवरे बशीर बागवान नितीन तावडे शशिकांत चंदिले राकेश सोनवणे आदि.