जामनेर – येथील कांग नदी काठावर धुणी धुण्यासाठी गेलेली महिला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. जायेदाबी शब्बीर शाह (वय ४४, रा. बिस्मील्ला नगर, जामनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, या महिलेचा हिवरखेडे बुद्रुक, ता.जामनेर येथील वाघूरच्या बॅक वॉटरजवळ मृतदेह सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आढळून आला.
जायेदाबी शाह या घरा शेजारील काही महिलांसोबत कपडे धुण्यासाठी कांग नदीवर गेल्या होत्या. दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसापासून परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्यांना पूर आला आहे. कांग नदी आज सकाळी अचानक आलेल्या पुरात त्या वाहून गेल्या. कांग नदीने या वर्षात घेतलेला हा पाचवा बळी आहे.