चाळीसगाव,(प्रतिनिधी)-सत्ताधारी विरोधकांसह ग्रामस्थांना विश्वासात न घेता एकटेच काम करत असल्याची तक्रार ग्रा. पं. सदस्यांसह ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कडे समस्या व तक्रारीचा थेट पाढाचं वाचला आहेत.
सविस्तर असे,की आर्थिक वर्ष 2019 – 20 / 2020- 21/ 2021- 22 दरम्यान ग्रामस्थांकडून घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली करण्यात आली. वसुलीच्या पावत्या व प्रोसिडिंग ग्रामपंचायत सदस्यांना दाखवण्यात आल्या नाहीत. सदर वसुलीही ढोमणे गावात नळ कनेक्शन या सबबीखाली जमा करण्यात आली.. जमा केलेली रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. नावे येथे घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्यात आली. जमा रक्कम व केलेला खर्च ग्रामपंचायत सदस्यांना दाखवण्यात अथवा सांगण्यात आला नाही. याबाबत 22 /9 /2021 रोजी पंचायत समिती चाळीसगाव कडे तक्रार अर्ज सादर केला होता परंतु अद्याप पावेतो कुठलीही चौकशी करण्यात आली नाही.
तसेच आर्थिक वर्ष 2018 – 2019 मध्ये 14 वा वित्त आयोग अंतर्गत शाळा डिजिटल हे काम नियमबाह्य पद्धतीने व शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. मौजे न्हावे व ढोमणे जि. प. शाळेला प्रत्येकी ….एक 40 इंची टीव्ही , एक कम्प्युटर आणि एक झेरॉक्स प्रिंटर इत्यादी शिक्षण उपयोगी वस्तू देण्यात आल्या. या व्यतिरिक्त इतर कुठलीही वस्तू देण्यात आली नाही. यासाठी ग्रामपंचायत बँक स्टेटमेंट प्रमाणे 3 लक्ष 66 हजार खर्च करण्यात आला. अवाजवी खर्च झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नावे येथील दोन युनिटचे सार्वजनिक सौचालय असून ते रोजच ओवरफ्लो होत आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून ग्रामस्थांना त्रास होत आहे. घरपट्टी पाणीपट्टी वसुली दरम्यान मोठा घोटाळा झाला असून त्याची चौकशी करून वसुली व्हावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
वरील प्रमाणे नमूद विषयानुसार येत्या पाच दिवसाच्या आत चौकशी न झाल्यास तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई न झाल्यास पंचायत समिती चाळीसगाव कार्यालयात ठिय्या आंदोलन केले जाईल असा लेखी इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह्या आहेत. तसेच वरिष्ठांकडे प्रती रवाना केले आहेत.
निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य गिरजाबाई भालचंद्र शेलार, भगवान बुधा सोनवणे, भीमराव महादु पिलोरे, वाल्मीक अर्जुन पगारे, डॉली वासुदेव पाटील, यांच्या सह्या आहेत निवेदन देताना भालचंद्र शेलार, लक्ष्मण पवार, निवृत्ती शेलार, प्रवीण पवार, रोहित पाटील, वासुदेव पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते