मुंबई – कोविड संसर्ग नियंत्रणात आल्याने रेल्वे प्रशासनाने कोरोनापूर्वीच्या नियमित चालविल्या जाणाऱ्या १७०० ट्रेन नियमितपणे चालवण्याचा मोठा निर्णय घेतला असून या सोबतच कोरोना काळातील विशेष रेल्वे, विशेष भाडे दर बंद होणार आहेत त्यामुळे रेल्वेचे तिकीट दर पूर्वीप्रमाणेच आकारण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
देशभरातील कोव्हीड संसर्गाचा (Coronavirus) ताप कमी झाल्याने तसेच कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्यामुळे सरकारनं संपूर्ण देशभरात सामान्य रेल्वे सेवा पुर्ण क्षमतेने पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने भाडे दर बाबत स्पष्ट केले आहे की,पूर्वी प्रमाणेच तिकिट दर राहणार असून कुठलेही विशेष दर आकरण्यात येणारं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच आता विशेष गाड्या देखील बंद होऊन नियमित रेल्वे गाड्या सुरु होतील.