वरणगाव – शहरातील किरणा दुकानदार व भाजीपाला विक्रेत्या, फळ विक्रेतेच्या दुकानात जाऊन नगराध्यक्ष व मुख्यधिकारी यांनी प्लास्टीक पिशवी , कॅरीबग चा वापर न करण्याचे करण्याचे आवाहन करीत शहरात जनजागृती करण्यात आली.
प्रदुषणाणाला पुरक प्रमुख घटक असलेल्या प्लास्टीकच्या कॅरिबॅग शहरातुन हद्दपार करण्या साठी नगर परिषदेच्या वतीने विशेष मोहीम राबवीत जनजागृती करुन किराणा दुकान , भाजी , विक्रेते , व फळ विक्रेते याच्या दुकानावर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी भेट देऊन प्लॉस्टीक कॅरीबॅग वापर न करण्याच्या सुचना देत कापडी पिशव्याचा वापर करण्याचे अवाहन करीत नगर परिषदेच्या या मोहीमेला नागरिकानी व व्यापाऱ्यानी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करीत जर सुचना देऊनही एखादा व्यापारी किंवा दुकान दार सुचनेचे उल्लघन करीत असल्याचे अढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी नगर परिषदेच्या वतीने सागण्यात आले.
या मोहीमेत नगराध्यक्ष सुनिल काळे मुख्याधिकारी श्यामकांत गोसावी, गणेश चाटे,पंकज सुर्यवंशी,श्रीधर जाधव , मनिष चव्हान , संजय माळी, राजु गायकवाड, दिपक भंगाळे, गणेश तळेले , कृष्णा माळी इत्यादी सहभागी होते.