जळगाव – येथील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांची मुंबई येथे पोलीस महासंचालक कार्यालयातील निवडणूक कक्षात बदली झाली आहे. पुढील आदेश होईपर्यंत नवीन नियुक्तीच्या ठिकाणी संलग्न रहावे असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे ही बदली नियमित आहे कि तात्पुरती हे स्पष्ट होत नाही. रोहोम यांना या ठिकाणी नियुक्ती होऊन एक वर्षही झाले नसून रोहोम यांच्या बाबतीत कोणतीही तक्रार किंवा वाद नसताना ही बदली झाली. अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल (आस्थापना) यांच्या स्वाक्षरीचे आदेश गुरुवारी रात्री जिल्हा पोलीस दलाला प्राप्त झाले.