भुसावळ,(प्रतिनिधी) – बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली असून भुसावळात आपल्या १६ वर्षीय मुलीवरच पित्याने सलग तीन वर्षांपासून अत्याचार केला मात्र छळ असह्य झाल्याने अत्याचाराला वाचा फुटली नराधम पित्याविरोधात पीडीत पोटच्या मुलीनेच बापा विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवल्याने पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पित्याला अटक करण्यात आली.
प्राप्त माहिती अशी की, पीडीत मुलगी वडिल व आत्या व भावासह राहते होती. पीडीतेच्या आईचे 13 वर्षांपूर्वीच निधन झाल्याने आत्यानेच पीडीतेचा सांभाळ पीडीतेच्या 41 वर्षीय पित्याने केला होता. पीडीतेच्या 41 वर्षीय पित्याने शनिवारी पहाटे अडीच वाजेदरम्यान पीडीतेवर पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने पीडीतेने विरोध करीत बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपी विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलिसात भाग 5, गु.र.नं. भादवि कलम 376 (3), 506 व बालकांचे लैंगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम-6 प्रमाणे चे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.