Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ईद-ए-मिलाद साजरा करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

Editorial Team by Editorial Team
October 18, 2021
in जळगाव
0
लम्पी स्किन डिसिज साथरोगाबाबतचा अहवाल त्वरीत सादर करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ईद- ए- मिलाद (मिलादुन नबी) शक्यतो घरात राहूनच साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, की ‘कोविड-19’ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद- ए-मिलाद (मिलादुन नबी) साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत. या सूचनांचे सर्वांनी पालन करावे. हा सण शक्यतोवर घरी राहूनच साजरा करावा. मात्र, मिरवणूक काढावयाची झाल्यास पोलिस प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी. एका मिरवणुकीत जास्तीत जास्त पाच ट्रक आणि एक ट्रकवर जास्तीत जास्त पाच जणांना परवानगी अनुज्ञेय राहील. मिरवणुकीदरम्यान मास्क, सॅनेटायझर व सामाजिक अंतराचे पालन करावे.

मिरवणुकीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. मिरवणुकीच्या दरम्यान स्वागतासाठी पेंडॉल बांधण्यासाठी शासनाच्या नियमानुसार संबंधित महापालिका, पोलिस व स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. या पेंडॉलमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत स्थानिक प्रशासनाने ठरविलेल्या विहित नमुन्यांचे पालन करावे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या शासन आदेशातील नियमांचे काटेकोरपणे पालन करून मास्क, सॅनेटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचनास परवानगी देण्यात येईल. प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावेत. त्याचे केबल टी.व्ही. फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाव्दारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी,

ईद ए मिलादनिमित्त मिरवणुकीच्या मार्गावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ तात्पुरत्या सबील (पाणपोई) लावण्यात येतात. त्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. तेथे पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. तेथे सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करावे. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे. प्रतिबंधित क्षेत्रात लागू असलेले निर्बंध कायम राहतील. त्यात कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. कोविड-19 परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबवावेत. या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. या सूचनांच्या व्यतिरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधित महापालिका, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाला असतील.

कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासनाने विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व मिरवणूक सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत आणखी काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेही अनुपालन करणे आवश्यक राहील. या सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहितेतील कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुमच्यासोबतही ऑनलाइन फसवणूक झालीय? तर अशा प्रकारे पैसे येतील परत

Next Post

जळोद येथे शेतावर दरोडा टाकून ६३ शेळ्या लांबविल्या

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल

जळोद येथे शेतावर दरोडा टाकून ६३ शेळ्या लांबविल्या

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us