जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील कांचन नगरात थेट घरात घुसून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दि.23 रोजी सकाळी घडली मात्र यात एक हल्लेखोरचं हा घटनास्थळी जखमी होऊन बेशुध्द झाल्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.या घटनेमुळे परिसरात खळबळ प्रचंड उडाली होती.
कांचन नागरातील आकाश सपकाळे याच्यावर हल्लेखोरांनी आज सकाळी आठच्या सुमारास घरात शिरून हल्ला केला.दरम्यान यावेळी सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. आकाशवर करण्यात आलेला प्राणघातक हल्ला हा पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समजते.