कोरोना काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
भारतीय रेल्वे प्रशासनाने अप्रेंटिसपच्या एकूण 3093 पदांची भरती जारी केली आहे. विशेष म्हणजे फक्त दहावी पास उमेदवार देखील नोकरीसाठी अर्ज दाखल करु शकतात. पात्र उमेदवार rrcnr.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे.
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवार अधिसूचनेमध्ये वयोमर्यादेसह इतर विहित पात्रतांची माहिती तपासू शकतात.
वयाची अट:
20 ऑक्टोबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : १०० रुपये
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची तारीख : 20 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2021
भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा