नोकरीच्या शोधात असलेल्या १० पास तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. इंडिया पोस्टने यूपी पोस्टल सर्कल भर्ती 2021 मध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी मोठ्या संख्येने रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 22 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.
रिक्त जागांची संख्या – 4264
पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
पात्रता – 10 वी पास (गणित, इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे)
वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
पगार – 10,000 रु
नोकरी ठिकाण – उत्तर प्रदेश
अर्ज फी
पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी अर्ज करणाऱ्या UR/OBC/EWS/पुरुष प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये जमा करावे लागतील. फी ऑनलाईन जमा करता येते किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हेड पोस्ट ऑफिस ला भेट देऊन जमा करू शकता. जर तुम्ही SC/ST/PWD/महिला उमेदवार असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात – 23 ऑगस्ट 2021
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2021
फी भरण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2021
अर्ज आणि निवड कशी करावी
तुम्हाला ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://indiapost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline ला भेट देऊन अर्ज करावा लागेल. लक्षात ठेवा, सर्व माहिती बरोबर असावी.
फॉर्म सबमिट करण्यापूर्वी क्रॉस चेक करायला विसरू नका. या रिक्त जागेत, 10 वी मध्ये उत्तीर्ण गुणांच्या आधारे निवड केली जाईल. लक्षात ठेवा, स्थानिक भाषेचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.