ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये ग्रेड III च्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ऑईल इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार एकूण 535 पदांवर भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2021 आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण नोटिफिकेशन वाचून घेणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे तर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 सप्टेंबर 2021 असा आहे. वेबसाईटवर अर्ज दाखल करताना उमेदवारांनी काळजीपुर्वक अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवाराचा अर्ज बाद होऊ शकतो.
या पदांची होणार भरती?
इलेक्ट्रीशियन – 38, फिटर – 144, मेकॅनिक मोटर वाहन – 42, मशीनिस्ट ट्रेड – 13 , मेकॅनिक डिझेल ट्रेड – 97, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड – 40 , बॉयलर अटेंडंट – 08,टर्नर ट्रेड – 04, ड्राफ्ट्समन सिव्हिल ट्रेड – 08, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक व्यापार – 81, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित सह – 44, सर्वेक्षक व्यापार – 05, वेल्डर व्यापार – 06, IT आणि ESM / ICTSM / IT व्यापार – 05
शैक्षणिक पात्रता
ऑईल इंडिया मधील या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शासकीय मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय सरकारी मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित व्यापारातील आयटीआय / व्यापार प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ऑईल इंडियाकडून लेखी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर मुलाखतीचं आयोजन केलं जाणार आहे.
वयोमर्यादा:
ऑईल इंडियामध्ये अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचं वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे या दरम्यान असावं. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमदेवाराचं वय किमान 18 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असावं तर नॉन -क्रीमी लेयरची अट पूर्ण करणाऱ्या ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराचं वय किमान 18 वर्षे आणि कमाल 33 वर्षे असावं.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 27700 ते 44770 रुपये या दरम्यान वेतन दिलं जाईल.
अर्ज फी
खुल्या प्रवर्गातील उमदेवारांसाठी 200 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे.परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनं सादर करावं लागणार आहे. एससी, एसटी, इडब्ल्यूएस आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क निश्चित करण्यात आलेलं नाही.
अर्ज दाखल कसा करायचा
स्टेप 1: उमेदवारांनी प्रथम ऑईल इंडियाच्या ऑफिशिअल वेबसाईट oil-india.com ला भेट द्यावी.
स्टेप 2: ग्रेड III पदासाठी भरती या लिंक वर क्लिक करा.
स्टेप 3: यानंतर नवीन वेब पेज ओपन होईल आवश्यक ती माहिती भरुन वेबसाईटवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा
स्टेप 4: यानंतर तुम्ही ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून ओटीपी मिळवा.
स्टेप 5: यानंतर ओटीपी मिळवल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
स्टेप 6: संपूर्ण अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 7: शेवटी परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा आणि भविष्यातील माहितीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रिंट आउट काढून सोबत ठेवा.