जळगाव,(प्रतिनिधी)- औरंगाबाद महामार्गावरील कन्नड घाटात सुरू असलेल्या संततधार पावसाने रात्री दरड कोसळली. यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.
रात्री पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळलेली असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे.महामार्ग विभागातर्फे वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सततच्या पावसामुळे व अवघड घाटामुळे सदर कामात अडचण येत आहे.सदर मार्गाने आपले प्रवासाचे नियोजन असल्यास ते तात्पुरते स्थगित करावे.