भुसावळ प्रतिनिधी:: येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा संगिता राजेंद्र भामरे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे.भामरे या अनेक वर्षांपासून महिलांसाठी काम करत असून विविध आंदोलने, मोर्चा द्वारे त्यांनी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे.
भुसावळ येथील राष्ट्रवादी चे नेते व माजी आमदार संतोषलाभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांच्या हस्ते सौ.संगिता भामरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला आहे.याप्रसंगी भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती सचिन संतोषभाऊ चौधरी, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सारीका पाटील, शहराध्यक्षा नंदा निकम उपस्थित होते.