नवी दिल्ली, दि.१७ – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल १ तास चर्चा झाल्याने राजकीय तर्क वितर्क लावले जात आहे.
पवार – मोदी या दोघांच्या भेटीचे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. मात्र दोघमध्ये झालेल्या चर्चेचा विषय गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.या दोघांमध्ये झालेल्या भेटीचे वृत्त शरद पवार यांनी ट्विट करून दिले आहे मात्र भेटीत चर्चा काय झाली यावर अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.
शरद पवारांची मोदींसोबतची भेट म्हणजे याला राजकीय अंग असल्याचं बोललं जात आहे.महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यसंदर्भात देत विविध तर्क लावण्यात येत आहे.