रावेर (भागवत महाजन)- खानदेशच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले, आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार आदरणीय उल्हासदादा, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप भैय्या या सर्वांची उपस्थितीत गोदावरी महाविद्यालयाच्या पटांगणात जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने आपल्या प्रलंबित समस्यांच्या बाबतीतला निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांना स्वाधीन केले.यापूर्वी प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे मागण्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.
विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाचा वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले होते त्याचे श्रेय आमदार नाना पटोले यांना जाते . आजही कनिष्ठ प्राध्यापक संघटनेने विशेषतः शासनाने जी प्रॉव्हिडंट फंडाची बीडीएस प्रणाली गेल्या मार्च पासून बंद केलेली आहे त्यामुळे कनिष्ठ सेवानिवृत्त होणाऱ्या कनिष्ठ प्राध्यापक त्याचबरोबर ज्या प्राध्यापकांनी आपल्या प्रॉव्हिडंट फंड वैद्यकीय कारणासाठी वा स्वतःच्या वैयक्तिक अडचणीसाठी कर्जरूपाने काढायचा असेल अशांना तो सद्यस्थितीत मिळत नाही, यासाठी शासनाने ती वेबसाईट लवकरात लवकर सुरु करावी असा आग्रह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरला. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी मुख्य मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक बंधू भगिनींचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतून सीएमपी प्रणालीद्वारे व्हावे याविषयी शासनस्तरावर आपण प्रदेशाध्यक्ष या नात्याने लक्ष घालून राज्याच्या शिक्षण मंत्री माननीय नामदार वर्षाताई गायकवाड यांना त्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी आपण आग्रह धरावा अशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांनां आग्रह धरला.
जवळपास आठ समस्या कनिष्ठ प्राध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांना निवेदन देतांना मांडलेत. शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील सोनार सचिव प्रा शैलेश राणे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, प्रा भारुडे, प्रा. प्रशांत वंजारी विनाअनुदानित कृती समितीचे प्रा अनिल परदेशी प्रा. महाजन यांनी दिले.