देशातील सर्वांत आघाडीची विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC मध्ये काम करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. एलआयसीहाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये सहयोगी पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जून २०२१ आहे. यात वार्षिक ९ लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.
पदाचे नाव : सहयोगी (Associate)
पात्रता :
ज्या उमेदवारांनी सोशल वर्क किंवा रूरल मॅनेजमेंटमध्ये किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, ते उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील.
वय :
१ जानेवारी २०२१ पर्यंत वय २३ ते ३० वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
LIC च्या या जागांच्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन चाचणी घेतली जाणार आहे. या टेस्टची मेरिट लिस्ट आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल, असे सांगितले जात आहे.
पदांची माहिती आणि मुदत
LIC Housing Finance मधील असोसिएटच्या ६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी सीटीसी (पगाराचे वार्षिक पॅकेज) ६ ते ९ लाख रुपये वार्षिक देण्यात येईल. २४ मे २०२१ रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०२१ आहे. या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुक्ल आकारण्यात येणार नाही, अशी माहिती मिळाली आहे.
भरतीबाबत जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा