जळगाव – जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागातर्फे आ.प्रणिती ताई शिंदे यांना मागासवर्गीय समाज पदोन्नती आरक्षणाचा निर्णय रद्द करावा या बाबत निवेदन देण्यात आले.
उत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे समन्वयक विद्यमान आ. प्रणिती ताई सुशील कुमार शिंदे जळगाव दौऱ्यावर आल्या होत्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने 7 मे 20 21 ला मागासवर्गीय समाजाच्या पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याचा जो निर्णय घेतला तो मागे घेण्यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती महिला विभागाच्यावतीने चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी जळगाव काँग्रेस अनुसूचित जाती महिला विभागातर्फे जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्षा प्रतिभाताई मोरे प्रदेश समन्वयक राहुल जी भैया मोरे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष विवेक भाऊ नरवाडे रावेर महिला तालुकाध्यक्ष मनीषाताई पाचपांडे भुसावळ शहर अध्यक्ष सुनील भाऊ जोहरे तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होते.