Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार

जळगाव जिल्ह्यातील पहिल्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

najarkaid live by najarkaid live
May 1, 2021
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) दि. 1 – जिल्ह्यातील भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर येथे उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

राज्यात ऑक्सीजनचा तुटवडा भासत असतानाच जळगाव जिल्ह्यात पहिलाच ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आमदार संजय सावकारे यांच्या आमदार निधीतून उभा राहत असल्याची बाब निश्‍चितच आनंददायी असून जिल्ह्यासाठी दिलासादायक असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की,
जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी लागणारा ऑक्सीजन जिल्ह्यातच निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहेत. येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यात दहा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दहा कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहेत. भुसावळ येथील या प्रकल्पामुळे रुग्णालयातील रूग्णांना पुरेसा ऑक्सीजन मिळणार आहे. भविष्यात आवश्यकता भासल्यास अजून एक कोटी नऊ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार असून तेही मंजूर करण्यात येईल. शिवाय या रूग्णालयास सुरक्षित भिंत बांधण्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तिसर्‍या लाटेसाठीही सज्ज

पालकमंत्री म्हणाले की, याठिकाणी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरू झाल्याने भुसावळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव, चोपडा, मोहाडी रोडवरील महिला रूग्णालय, धरणगाव, पारोळा, भडगाव, रावेर, अमळनेर या दहा ठिकाणी याच धर्तीवर ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभे राहणार असून भविष्यात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्यासाठी जिल्हा सज्ज आहेत.

जिल्ह्यातील रुग्णांलयामध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात आला असून ग्रामीण रुग्णालयातील विद्युत प्रश्‍नासाठी 48 लाख रुपये आमदारांच्या सूचनेवरून मंजूर करण्यात आले आहेत. यापुढेही आमदार संजय सावकारे व नगरपालिकेतर्फे जी विकास कामे सुचविली जातील ती पूर्ण करण्यासाठी कटीबध्द राहील, असेही पालकमंत्री म्हणाले.

शहर व तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार- आमदार सावकारे

यावेळी आमदार संजय सावकारे म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात आमदार निधीतून उभारण्यात आलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत लक्षात आले होते की, ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात लागत असतो व वारंवार ऑक्सीजन सिलिंडर भरण्यासाठी पाठवावे लागण्याची बाबही खर्चिक आहे. मात्र आता रुग्णालयातील शंभर बेडसाठी एकाचवेळी ऑक्सीजनची सुविधा पुरवता येणे शक्य झाल्याने शहर व तालुक्यातील रुग्णांनाही दिलासा मिळणार आहे.

यांची होती उपस्थिती

या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. नागोजीराव चव्हाण, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार दीपक धीवरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, बाबासाहेब ठोंबे, रामकृष्ण कुंभार, नगरसेवक मनोज बियाणी तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी, डॉ.नितु पाटील, डॉ.चाकूरकर, डॉ.विक्रांत सोनार आदी उपस्थित होते.

एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार

एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजनची या प्रकल्पातून निर्मिती होईल. हवेमधून ऑक्सिजन एकत्र करून हा थेट मशीनरीच्या माध्यमातून रुग्णांना पुरविला जाईल. या प्रकल्पामुळे आता बाहेरून ऑक्सिजन सिलिंडर आणण्याची आवश्यकता भासणार नाही, त्यामुळे वेळेबरोबरच शासनाच्या निधीची देखील बचत होईल. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली.

000000

Spread the love
Tags: #BreakTheChain #StayHome #corona
ADVERTISEMENT
Previous Post

आता शासन ‘या’ करिता उभारणार ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टरांचे स्वतंत्र नियंत्रण कक्ष

Next Post

‘सहजयोग’ ध्यान साधने ला ५१ वर्षे पूर्ती ; आज घरबसल्या पहा…आत्मसाक्षात्कार आणि ध्यान कार्यक्रम

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
‘सहजयोग’ ध्यान साधने ला ५१ वर्षे पूर्ती ; आज घरबसल्या पहा…आत्मसाक्षात्कार आणि ध्यान कार्यक्रम

'सहजयोग' ध्यान साधने ला ५१ वर्षे पूर्ती ; आज घरबसल्या पहा...आत्मसाक्षात्कार आणि ध्यान कार्यक्रम

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us