जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात १०३० रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १०९१६९ रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या १०६६१ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात १००७ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या १२२००४ झाली. जिल्ह्यात आज २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २१८४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर १४१, जळगाव ग्रामीण २०, भुसावळ १०१, अमळनेर ४७, चोपडा ३२, पाचोरा १४८, भडगाव ०८, धरणगाव १२, यावल ३१, एरोंडल ५८, जामनेर ११२, रावेर ४७, पारोळा १७, चाळीसगाव ५८, मुक्ताईनगर १११, बोदवड ६१, इतर जिल्हातील ०३ असे रुग्ण आढळून आले आहेत.
दिलासादायक…
जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या (23 ने) जास्त असून ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही (44 ने) कमी झाली आहे.