यावल प्रतिनिधी (दिपक नेवे) रोजच्या जीवनावश्यक वस्तूंपैकी खाद्यतेल ही एक महत्त्वाची वस्तू आहे खाद्यतेला शिवाय रोजचा स्वयंपाक होऊ शकत नाही एवढे महत्वाचे वस्तू म्हणून खाद्यतेल असतांना तेलाचे भाव जवळपास दीडशे रुपये किलो झालेले असून भाव गगनाला भिडले आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पुरता कोलमडले असून एवढ्या महागाचे तेल विकत घेणे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर होत आहे त्यामुळे शासनाने या जीवनावश्यक बाबीकडे लक्ष देऊन खाद्यतेलाचे भावकमी करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकां कडून केली जात आहे.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावाने उच्चांक घातलेला असून आता जवळपास दीडशे रुपये किलो मिळत आहे तर होलसेल ला जवळपास एकशे पंचेचाळीस चा भाव आहे त्यामुळे दुकानदारांकडून दीडशे रुपये किलो च्या वरती विकली जात आहे एवढे महागाचे तेल घेणे सर्वसामान्य नागरिकांना परवडेनासे झालेले आहे सध्या तर शेतमजुरांना मजुरीची कामे नसल्याने त्यांच्याकडे आर्थिक सोते नाही त्यामुळे संसाराचा जेमतेम खर्च भागवित असतांना एवढ्या महागाचे तेल खायचे कसे?असा प्रश्न सर्वसामान्य तसेच मजूरवर्गाला पडलेला आहे. मजुरी अभावी सध्या लोकांकडे पैसा आली नाही अशी परिस्थिती आहे.
■तेलाच्या भावाचे रडगाणे गृहिणींना सोसवेना…
महिला वर्गाला रोजच्या स्वयंपाकासाठी खाद्यतेलाची नितांत गरज असते. त्याशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही तथापि गेल्या चार- पाच महिन्याअगोदर तेलाचे भाव शंभर रुपये किलो च्या आतच होते. मात्र आता अचानक जवळपास दोन महिन्यांपासून तेलाने भावात एकदम मोठी वाढ झाल्याने महिलांना खाद्यतेला अभावी स्वयंपाक करणे कठीण बनले आहे.स्वयंपाक करतांना तेलाचा वापर अतिशय काटकसरीने करावा लागत आहे.खाद्यतेलाच्या वाढत्या भावाचा महिलावर्गाला मोठा आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागत आहे. वाढीव तेलाच्या भावाने महिलांच्या स्वयंपाक गृहातील आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे
■ खाद्यतेल विक्रेत्यांकडून लूट? – सध्या कोरोनाचा महामारीने लॉक डाऊन सुरू झालेले आहे या लॉक डाऊन व कडक निर्बंधाचा फायदा घेत किरकोळ खाद्यतेल विक्रेते चढ्या भावाने तेलाची विक्री करू शकता अव्वाच्या सव्वा भाग लागून तेलाची विक्री होऊन सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक लूट होऊ शकते या बाबीकडे सुद्धा संबंधित प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची मागणी होत आहे.
■लोकप्रतिनिधी व अधिकारी गप्प का ?
सध्या खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडलेले असतांना तेलाच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना रोज कमवायचे व खायचे अशी परिस्थिती असणाऱ्या सर्वसामान्य मजुरांना तर एवढी महागाचे तेल घेणे अवघड बनले आहे जीवनावश्यक वस्तू पैकी तेल ही एक मुख्य वस्तू आहे.जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राहिला पाहिजे असे शासनाचे धोरण आहे. मग आता या धोरणाची झाले काय ? की कोणीही या तेलाच्या प्रश्नाकडे लक्ष देत का नाही ? लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांचे या सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत का गप्प आहे ? असे संतप्त प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.तरी सध्याच्या महागाईत भरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्यांना खाद्यतेलाचे भाव कमी करण्यात यावे व दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व मजूर यांच्याकडून केली जात आहे.