चुंचाळे ता.यावल- चुंचाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.सुनंदा पाटील व ग्रामसेवक प्रियांका बाविस्कर(मॅडम) ग्रामपंचायत सदस्य रहेमान तडवी, संजय पाटील तसेच शिपाई मनीष पाटील,ग्रामरोजगार सेवक दीपक कोळी यांचेसह ग्रामस्थ विनोद पाटील, संजय पाटील उपस्थित होते.