मे. विशाल इन्टेलीजन्स सेक्युरिटी सर्व्हिसेस मालकाविरुद्ध आमरण उपोषण सुरु
जळगाव – मे. विशाल इन्टेलीजन्स सेक्युरिटी सर्व्हिसेस कडून तापी पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणारे वाघुर धरण विभाग जळगाव कार्यालयाकडे बनावट एपतदारी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सुरक्षा रक्षक एजन्सी मालक दिनकर चौधरी विरुद्ध गुन्हा दाखल करा या मागणीसाठी तापी महामंडळच्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालया समोर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद इंगळे यांनी आज दि. 27 रोजी पासून अमरण उपोषणास सुरवात केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, मे. विशाल इन्टेलीजन्स सेक्युरिटी सर्व्हिसेस कडून शासनाला बनावट एपतदारी प्रमाणपत्र सादर केले आहे. सदरचे एपतदारी प्रमाणपत्र हे दि नाशिक मर्चंट को -ऑफ बँकच्या नावाने असून सदरचा हा प्रकार कार्यकारी अभियंता वाघुर धरण विभाग यांना संबंधित बँके कडून दिनांक 24 ऑक्टोबर 2018 रोजी कळविले आहे. सदर पत्रात बँकेने नमूद केले आहे की, मे. विशाल इन्टेलीजन्स सेक्युरिटी सर्व्हिसेस यांना आमच्या बँकेकडून कुठलेही एपतदारी प्रमाणपत्र दिलेले नाही सर्व पुरावे असताना देखील वाघुर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता सुरक्षा रक्षक एजन्सीला पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील प्रमोद इंगळे यांनी केला असून दोषीवर तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली आहे. उपोषणास प्रमोद इंगळे, शांताराम अहिरे, भीमराव निकम, रवी सोनवणे आदी उपस्थित होते.
आम्ही शासनाची कुठलीही फसवणूक केलेली नाही…
मे. विशाल इन्टेलीजन्स सेक्युरिटी सर्व्हिसेस चे मालक दिनकर चौधरी याविषयी भ्रमणध्वनी वर संपर्क साधला असताना ते म्हणाले की आम्ही शासनाला बनावट एपतदारी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. एवढेच सांगून इतर बोलणे टाळले.