मुंबई, (प्रतिनिधी)- सुरत (गुजरात )मधील कोरोना ग्रस्त रुग्णांची परिस्थिती दर्शविणारे, रुग्णांची होतं असलेली हेळसांड बाबतचे छायाचित्र आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून ‘मोदी, शहाचे प्रामाणिक 105 फॅमिली मेंबर’ याबद्दल तोंड उघडतील काय? असा तिरकस सवाल महाराष्ट्रातील भाजपच्या १०५ आमदारांना केला आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होतं असतांना राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे. बेड्स, व्हॅन्टिलिटर, ऑक्सिजन सेवा उपलब्ध होतं नसल्याने महाराष्ट्र भाजपानं राज्य सरकारला लक्ष केल्याचे दिसून येत असतांना आज आमदार अमोल मिटकरी यांनी गुजरात मधील कोरोना ग्रस्त रुग्णांची होतं असलेल्या गैरसोयीचे फोटो ट्विट करून यावर ‘मोदी शहाचे प्रामाणिक 105 फॅमिली मेंबर याबद्दल तोंड उघडतील काय? असा तिरकस सवाल उपस्थित करून विरोधकांवर टीका केली आहे.