जळगाव, (प्रतिनिधी)-अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का ? असा सवाल भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे (suresh damu भोळे )यांनी उपस्थित करून ट्विटरच्या माध्यमातून परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.
एपिआय सचिन वझे यांनी लेटर बॉम्ब टाकत परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दरम्यान अनिल परब यांनी सर्व आरोपांच खंडन करीत फेटाळून लावले आहेत.
सचिन वाझे यांचं खळबळजनक पत्र समोर आल्यानंतर अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.विरोधकांनी मात्र अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहावी लागेल का असा प्रश्न उपस्थित करून ट्वीटरच्या माध्यमातून अनिल परब यांना लक्ष्य केले.