जळगाव,(प्रतिनिधी)- पाचोरा तालुक्यातील खेडगाव नांदीचे येथील रहिवाशी असलेले वकील, पत्रकार, लेखक व आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते गौतम बाविस्कर यांचं आज दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी निधन झाले.
गौतम बाविस्कर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल कारण्यात आले होते.गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलं,आई,भाऊ असा परिवार आहे.