यावल,(प्रतिनिधी)- तालुक्यातील मारूळ ते न्हावी या पाच किलोमिटर मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे शुभारंभ रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते दिनांक 20 रोजी करण्यात आले.
दरम्यानआमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या सुमारे १ कोटी८ लाख रुपये निधी खर्चाच्या रस्ता दुरूस्ती डांबरीकरण कामाचे शुभारंभ आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते भुमीपुजन व कुदळ मारून करण्यात आले , या प्रसंगी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , यावल पंचायत समितीचे गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर सोपान पाटील , पंचायत समिती सदस्य सरफराज सिकंदर तडवी , काँग्रेसचे कार्यकर्ते जावेद अली सर , मारूळ ग्रामपंचायत सरपंच सय्यद असद अहमद जावेद व सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
बऱ्याच दिवसांपासुन या मार्गावरील रस्त्याची ठीक ठीकाणी खड्डे पडल्याने दयानिय अवस्था झालेल्या रस्त्यावरून चालणे वाहनधारकांना फारच जिकरीचे झाले होते .आमदार शिरीष चौधरी यांनी विशेष लक्ष घालुन या मार्गासाठी निधी मंजुर करून प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाल्याने मारूळ वासीयांनी त्यांचे आभार मानले.