जळगाव, (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाची महानगर पालिकेतील सत्ता मोडीत काढत शिवसेने महापालिकेवर भगवा फडकवला असून महापौर पदी सौ. जयश्री महाजन तर उपमाहापौर पदी कुलभूषण पाटील काल दि.18 रोजी निवड झाली असून बहुमतासाठी शिवसेनेने एमआयएम (AIMIM) च्या तीन नगरसेवकांच पाठबळ घेतल्याने भाजपाचे डॉ. राधेशाम चौधरी यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून जोरदार टीकास्र सोडले आहे.
डॉ. राधेशाम चौधरी यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की,’जळगाव मनपावर शिवसेनेच्या झेंड्याला एमआयएम (AIMIM) चा दांडा…व्वा. . काय वाटचाल सुरू आहे सेनेची. . . जनता बघतेय सारं… असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.
जळगाव महानगर पालिकेवर भाजपाचं स्पष्ट बहुमत असतांना भाजपाचे नगरसेवक यांनी स्वपक्षावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या गोटात दाखल झाले व शिवसेनेचा महापौर होण्यास मदत झालीच सोबतच एमआयएम (AIMIM) च्या तीन नगरसेवकांनी सेनेच्या बाजूनं मतदान केलं आहे.त्यामुळे मनपातील भाजपाची सत्ता गेली.