राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या ‘त्या’ बारा नावांच्या यादीवर अजून किती दिवस अध्ययन होणार असा मुद्दा खासदार तथा ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाने पुन्हा चर्चेला आला आहे.
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांचा कार्यकाळ जून मध्ये संपला असतांना या रिक्त बारा जागांसाठी महाविकास आघाडीने नावं निश्चित करून राज्यपाल यांच्याकडे दिले आहे. राज्यपाल यांना बारा नावांची शिफारस करणारं पत्र देतांना पंधरा दिवसात नियुक्ती करण्याचं देखील सांगण्यात आलं होत त्या नुसार 21नोव्हेंबरला पंधरा दिवस पूर्ण झाले असून अद्यापही त्या बारा नावाच्या यादीवर विधानभवनातून निर्णय न आल्याने राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या ‘त्या’ बारा नावांच्या यादीवर अजून किती दिवस अध्ययन ? असा मुद्दा चर्चेला आला आहे.
राज्यपाल नियुक्त विविध क्षेत्रातील बारा जागांवर सदस्य नियुक्तीचा अधिकारी घटनेनं राज्यपाल यांना दिला आहे तर या नियुक्त्या करतांना मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करायला हवी असं अपेक्षित असलं तरी राज्यपाल यांना यासाठी कुठलेही वेळेचे बंधन राज्यघटनेने घालून दिलेले नाही त्यामुळे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपाल यांचा असतो.
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त सदस्य निवड प्रक्रिया प्रलंबित आहे. काल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली यावेळी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या ‘त्या’ बारा नावांच्या यादीवर अजून किती दिवस अध्ययन ? अध्ययनालाही मर्यादा असतात, परीक्षा असते, पदवी असते… असा प्रश्न विचारला असता ‘ महाराष्ट्र सर्व पाहत आहे’ असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी देऊन राज्यपालांना टोला लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत तर मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकार मधील मंत्रीही अनेक वेळा राज्यपालांवर निशाण साधतांना दिसतात.
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या ‘त्या’ बारा नावांच्या यादीच्या नियुक्ती बाबत अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल की त्या बारा नावांची यादी राज्यपाल नाकारतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेलं