जळगाव – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे व्हा. चेअरमन वीरेंद्रदादा भोईटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी नूतन मराठा महाविद्यालयात आज दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता साजरा करण्यात आला.
नूतन मराठा महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक यांच्या विशेष सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांनी उस्फुर्तपणे रक्तदान करण्यात आले.
महाविद्यालय आवारात वृक्षारोपण
मविप्र संस्थेचे व्हा.चेअरमन वीरेंद्रदादा भोईटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रागंणात महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येऊन विद्यार्थ्यांना वृक्षारोपण वाटप करण्यात आले.यावेळी एका विद्यार्थ्याला एक झाड व टी गार्ड देखील वाटप करून झाड जागविण्याचा संकल्प करण्यात आला.यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन वीरेंद्रदादा भोईटे,डॉ.धनश्री भोईटे, प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख, उपप्राचार्य, नाना चव्हाण, केतन पोळ, प्रदीप घुगे,अर्जुन भारुडे, रॉक सोनवणे, मुन्ना कोळी आदी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.